Skip to main content

Posts

Featured

रामभक्तीचा श्रद्धासागर

#रामजन्मभूमी #जयश्रीराम गेले काही दिवसांपासून चढत्या क्रमाने रामभक्तीचा समाजजीवनातला उंचावलेला गजर सहज जाणवून येतो आहे. घरांच्या खिडक्यांतून , अंगणांमधून उंचावलेले भगवे झेंडे, त्यावरची श्रीरामाची राजस प्रतिमा , चौकात रस्त्यांवर लावलेल्या केशरी पताकांची सजावट , पौषाच्या झुळुकीसरशी आपले अस्तित्व दाखवून देणारी , सोसायटी -बागांमध्ये संध्यासमयी गुंजणारे कीर्तनाचे, भजनांचे सूर , आणि घरी येऊन पोचलेल्या आमंत्रण अक्षता या सगळ्यामुळे येऊ घातलेल्या श्रीराम -प्राण प्रतिष्ठा सोहोळ्याची एक वातावरण निर्मिती नक्कीच झाली आहे. याच्या भरीला समाज माध्यमांतून आणि टीव्ही चॅनेल्स मधून आपल्यापर्यंत पोचणाऱ्या अयोध्या, श्रीराम, नवीन मंदिर , प्राण प्रतिष्ठा, रामल्लाची मूर्ती , त्यासाठी चाललेली पूर्वतयारी याविषयक माहितीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा स्रोत यामुळे आपण काहीतरी महत्वाची, आनंदाची, प्रतिष्ठेची घटना अनुभवणार आहोत असा निर्माण होणार विश्वास ! केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली सुट्टी , सांसदीय पदावरील नेत्यांचा ह्या सोहळ्यातील समावेश आणि खुद्द पंतप्रधानांनी अनुष्ठान पूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्याचा घ

Latest Posts

दृष्टीआडची देवळे - भाग १ ते ४